Friday, 18 January 2019

#INDvWI भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटीची आजपासून सुरुवात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज म्हणजेच शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.

हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना होत आहे, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे टीम इंडिया गोलंदाजीसाठी मैदानावर उतरली आहे, या सामन्याद्वारे शार्दुल ठाकूर आतंरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट संघात एंट्री करत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला, त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असून आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे, त्यासाठी टीम इंडियात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच सामना असून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शार्दुल हा भारताचा 294 वा खेळाडू ठरला आहे.

मोहम्मद शमीला या सामन्यात आराम देण्यात आला असून शार्दुलची प्लेईंग इलेव्हनमध्ये एंट्री झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच सामना आहे, तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार शार्दुल हा भारताचा 294 वा खेळाडू ठरला आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card