Tuesday, 18 December 2018

आशिया कप 2018 : ‘भारत-अफगाणिस्तान’च्या रंगतदार सामन्यात टाय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आशिया कपसाठी झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात टाय झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावलणार हा सामना अखेर बरोबरीने सुटला.

रवींद्र जाडेजाने शेवटच्या चेंडूपर्यंत शर्थीने लढण्याचा प्रयत्न केला, मात्र अवघा एक चेंडू शिल्लक असताना तो झेलबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.

आशिया चषकातल्या सुपर 4 साखळीतल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजात मोहम्मद शाहजादच्या 124 आणि मोहम्मद नबीच्या 64 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमावत 252 धावा केल्या.

रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 3 गडी बाद केले, या सामन्यात धोनी लवकर बाद झाल्यानंतर फलंदाजीही जाडेजानेच सांभाळली.

अखेरच्या 50 धावा जोडताना भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आले, मात्र त्यांनी शेवटपर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवले.

अखेरच्या षटकांमध्ये चहर आणि कुलदीप यादव रन आऊट झाले. यानंतर अखेर बॉल टू बॉल लढत भारतीय संघाने आपल्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि सामना बरोबरीने सुटला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card