Saturday, 15 December 2018

भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

साखळी गटात अपराजीत राहिलेला भारतीय संघाचा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटातल्या बांग्लादेशसोबत चांगलाच सामना रंगला.

बांग्लादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला.

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारत अंतिम फेरीत आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी मैदानात उतरला होता. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघांने हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी दिली आहे.

  • भारताने प्रथम फलंदाजी करणा-या बांग्लादेशला 49.1 षटकात 173 धावांत गुंडाळला
  • त्यानंतर भारताने 36.2 षटकात 3 बाद 174 धावा केल्या.
  • रोहितने 104 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या.
  • त्याआधी रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. 
  • रोहितने सावध परंतु दमदार अर्धशतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्का मारला. 
loading...

राशी भविष्य

Cricket Score Card