Wednesday, 16 January 2019

आजपासून भारत-इंग्लंड चौथा कसोटी सामना, भारतीय संघात मुरली विजयऐवजी पृथ्वी शॉला स्थान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली

भारत-इंग्लंड दरम्यान आजपासून चौथ्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे.

ट्रेंट ब्रिजवरील इंग्लडबरोबरच्या तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर भारतील संघ चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे.

पहिल्या 2 कसोटी सामन्यांत निराशाजनक पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीत 203 धावांनी जोरदार विजय मिळवला आहे.

तरीही भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 असा पिछाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत विराटने 97आणि 103 धावा करताना विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

याशिवाय मालिकेत भारताने मिळवलेल्या 46 पैकी 38 बळी हे वेगवान गोलंदाजांचे आहेत.

चौथ्या कसोटीसाठी भारताची मदार हार्दिक पंडय़ासह वेगवान गोलंदाजांवर असेल.

जसप्रित बुमरा खेळू न शकल्यास इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीसोबत उमेश यादवचा समावेश केला जाणार आहे.

तसेच या सामन्याध्ये मुरली विजयऐवजी मुंबईच्या पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card