Wednesday, 16 January 2019

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंंस्था, नवी दिल्ली

एशियन गेम्स 2018 स्पर्धेमध्ये भारताला पहिल्या सुवर्ण. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे सुवर्णपदक माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया त्यांने ट्विटरवरुन केलं आहे.

तर बजरंगने जपानच्या तकातानीला 10-8 ने धोबीपछाड देत सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंग पुनिया आणि आणि जपानच्या तकातानीमध्ये रोमहर्षक सामना रंगला होता, पण बजरंग पुनियाने जबरदस्ती खेळी केली. बजरंगने दोन अंकाची कमाई करत सुवर्णपदक पटकावले आहे.

१० मीटर एअर रायफल पुरूष गटात भारताच्या दीपक कुमारला रौप्य पदक मिळाले आहे. चीनच्या यांग हरोनने बाजी मारल्याने दीपक कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

कालपासून जकार्तामध्ये सुरू झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरूवात झाली. यात भारताने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. 

पहिल्या दिवशी भारताची पदक कमाई -

  • नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कांस्य पदकाची कमाई 
  • 28 वर्षीय रवी कुमारने 2014 च्या एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले

एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card