Saturday, 17 November 2018

माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर अनंतात विलीन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकरांवर दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "वाडेकर सर अमर रहे" अशा घोषणा देत चाहत्यांनी वाडेकर यांना अखेरचा निरोप दिला.

त्यांचा मुलगा आणि मुलगी परदेशातून आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याआधी सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं.

आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांची ओळख होती.

बुधवारी रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकर यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वरळी सी फेस येथील स्पोर्टसफील्ड अपार्टमेंट निवासस्थानी वाडेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

सकाळी १० वाजल्यापासून क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वाडेकरांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर, साबा करीम, विनोद कांबळी, संदीप पाटील, वासू परांजपे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि दिव्यांग क्रिकेटपटू यांनीही वाडेकर यांना श्रध्दांजली वाहिली. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card