Friday, 14 December 2018

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंत इंग्लंडने 163 धावा केल्या आहेत. तर भारताला 3 गडी बाद करण्यात यश आले. 

उपहारानंतर 1 बाद 83 या धावसंख्येवरून सुरूवात केली. त्यानंतर शमीने इंग्लंडला 2 धक्के दिले. पण नंतर रूट-बेअरस्टो जोडीने डाव सावरला. रूट 65 तर बेअरस्टो 31 धावांवर खेळत आहे.

आज सामना सुरु झाल्यावर अनुभवी अलिस्टर कुक आणि किटन जेनिग्स हे दोन डावखुरे फलंदाज मैदानावर आले. उमेश यादव आणि इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजाच्या जोडगोळीने त्यांच्यावर भेदक मारा करण्यास सुरुवात केली. 

अश्विनने आपल्या दुसऱ्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकला 13 बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट फाॅर्ममध्ये

भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पदार्पण केल्यावर कमी दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करण्याचा विश्वविक्रम रुटने आपल्या नावावर केला आहे. 

हा सामना सुरु होण्यापूर्वी रुट सहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 40 धावांनी पिछाडीवर होता. या सामन्यात अश्विनला चौकार लगावत रुटने 43 धावा पूर्ण केल्या आणि सहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

रुटने 13 डिसेंबर 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पण केल्यावर 2058 दिवसांमध्येच रुटने सहा हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा विश्वविक्रम रचताना रुटने अॅलिस्टर कुक (2168), केव्हिन पीटरसन (2192), डेव्हिड वॉर्नर (2216) यांना मागे टाकले आहे.

हा विक्रम करणारा रुट हा दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (26 वर्षे 313 दिवस) हा सहा हजार धावांचा पल्ला गाठणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता, त्यानंतर रुटचा दुसरा क्रमांक लागतो.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card