Sunday, 16 December 2018

हिमाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

असामची 18 वर्षीय हिमा दासने 12 जुलैला फिनलॅंडच्या टॅम्पॅरेमध्ये अंडर-20 ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे.

स्पर्धा जिंकल्यावर हिमाला सुवर्ण पदक देण्यात आलं आणि त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच हिमाला अश्रू अनावर झाले. तिचा हा भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. 

या ऐतिहासिक विजयावर हिमाला अनेक बॉलीवूड स्टार्सने शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयावर हिमाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हिमाला बॉलीवुडमधून अमिताभ बच्चनसह शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.  

कोण आहे हिमा?

 • आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्याशा ढिंग गावात हिमाचा जन्म
 • तिच्या वडिलांच्या भाताच्या शेतातच तिचं प्रशिक्षण झालं
 • मात्र गेल्या वर्षीपासूनच तिनं रेसिंगमधील सहभाग गंभीरपणे घेतला 
 • या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये हिमानं सहावा क्रमांक पटकावला
 • त्यावेळी तिनं ४०० मीटरचं हे अंतर ५१.३२ सेकंदामध्ये पार केलं
 • या खेळानंतर सातत्यानं तिची कामगिरी उंचावत गेली.
 • दरम्यान तिनं नुकतंच आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.
 • तर आता जागतिक स्तरावर सुवर्णपदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
 • या कामगिरीनंतर तिनं नीरज चोप्राच्या कामगिरीसह बरोबरी केली
 • नीरज चोप्रानं २०१६ मध्ये पोलंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं
 • तर, या श्रेणीतील सर्वप्रथम भारतीय महिला हा मानदेखील तिनं प्राप्त केला

एथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card