Wednesday, 16 January 2019

#FifaWorldCup2018 कोलंबियाला चकमा देत इंग्लंडचा शानदार विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंड आणि कोलंबिया या दोन्ही संघाकडून तोडीसतोड खेळ झाला.  इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाच्या नाट्यमय खेळाने सामन्याला कलाटणी दिली.

इंग्लंडने4-3 (1-1) अशी बाजी मारून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर स्वीडनचे आव्हान असणार आहे. 

  • इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले.
  • संघाचा प्रमुख खेळाडू जेम्स रॉड्रीगेज दुखापतीमुळे या लढतीला मुकला.
  • त्याही परिस्थितीत कोलंबियाने कौतुकास्पद खेळ केला.
  • 41 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राबाहेरून मिळालेल्या फ्री किकवर इंग्लंडच्या खेळाडूला अपयश 
  • सामन्याच्या सुरुवातीलाच हॅरी केनने हेडरव्दारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.  
  • मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून गोलचे वारंवार प्रयत्न सुरू झाले,
  • परंतु 58व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर इंग्लंडने आघाडी घेतली.
  • कार्लोस सांचेझने पेनल्टी क्षेत्रात इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनला पाडले आणि पंचांनी त्वरीत स्पॉट किकचा इशारा दिला.
  • केनने त्यावर कोलंबियाच्या गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिनाला चकवून इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणा-या खेळाडूंमध्ये केन ( 7) दुस-या स्थानी झेप घेतली आहे. या यादित गॅरी लिनकर दहा गोलसह अव्वल स्थानावर आहेत. 

#FifaWorldCup2018 इंग्लंडचा पराभव करत बेल्जियम अव्वल स्थानावर...

#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card