Monday, 24 September 2018

#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषकात इंग्लंडने पनामाचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत बाद फेरी गाठली. साखळी फेरीतल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा अक्षरश: फडशा पाडला.

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडने पहिल्यांदाच सामन्याच्या पहिल्याच सत्रात पाच गोल डागण्याची किमया साधली. याआधी ग गटातल्या सलामीच्या लढतीत इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 ने विजय मिळवला होता.

  • इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 22, 45 आणि 62 व्या मिनिटाला गोल डागत हॅटट्रिक केली.
  • केनने यातले दोन गोल हे पेनल्टीवर नोंदवले.
  • हॅरी केनने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत दोन सामन्यात सर्वाधिक पाच गोल नोंदवले.
  • याशिवाय इंग्लंडकडून जॉन स्टोन्सने दोन तर जेसी लिनगार्डने एका गोलची नोंद केली. 
  • या सामन्यात इंग्लंडने पूर्वार्धात 5-0 अशी आघाडी घेतली होती. 
  • पनामाकडून 78 व्या मिनिटाला फिलिप बेलॉयने एकमेव गोल नोंदवला.
  • पनामाचा विश्वचषकातला हा पहिलाच गोल ठरला.

#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...

#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card

Facebook Likebox