Tuesday, 13 November 2018

#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटाच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सने पेरूचा १-० असा पराभव केला. 

 • सामना सुरु झाल्यापासून फ्रान्सची आक्रमण फळी अत्यंत तीव्रपणे गोलपोस्टवर आक्रमण करत होती. 
 • कायिलन एमबापे, ग्रीझमान आणि मातुडी या आक्रमण फळीने पेरूच्या गोलपोस्टवर सतत हल्ला चढवला.
 • अखेर फ्रान्सतर्फे १९ वर्षीय  कायिलन एमबापे याने ३४ व्या मिनिटाला गोल केला
 • पास केलेल्या फुटबॉलला गोलकिपरची नजर चुकवत त्याने गोल केला
 • फ्रान्सने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली.
 • उत्तरार्धात मात्र कोणालाही गोल करता आला नाही, त्यामुळे फ्रान्सने सामना जिंकला.
 • क गटात फ्रान्सचा हा दुसरा विजय
 • या विजयामुळे फ्रान्सला ६ गुणांसह बाद फेरीत स्थान मिळाले
 • १२ जुलै १९९८ रोजी फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला होता.

कायिलन एमबापे - 

 • कायिलन एमबापे ठरला १९९८ नंतर जन्मलेला पहिला खेळाडू
 • फ्रान्सकडून एखाद्या मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषक किंवा युरो कपमध्ये गोल करणारा एमबापे हा सर्वात तरुण खेळाडू     

 

#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले

#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी

#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card