Tuesday, 20 November 2018

#FifaWorldCup2018 स्पेन - इराण स्पर्धेत स्पेनने 1–0 ने मिळवला पहिला विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेनने इराणला 1 - 0 ने पराभूत केले आहे. 2018 च्या फिफा विश्वचषकातील स्पेनचा हा पहिला विजय असून, या विजयाने स्पेनने ब गटात प्रथम स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत इराणन आणि स्पेननधील सामना चांगलाच रंगला होता. 54 व्या मिनिटाला स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टाने गोल मारत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

स्पेनच्या स्ट्रायकर डिएगो कोस्टाने एकमेव गोल मारत सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. डिएगो कोस्टाचा या विश्वचषकातील तिसरा गोल आहे. फुटबॉलवर कंट्रोल असलेली टीम म्हणून स्पेनची ओळख आहे. मात्र या सामन्यात इराणच्या बचाव फळीने उत्तम खेळ करत स्पेनच्या खेळाडूंना रोखून धरले होते.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card