Sunday, 16 December 2018

हिजाब अनिवार्य, इराणमधील बुद्धिबळ चॅम्पियनशिप भारतीय स्टार खेळणार नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय महिला ग्रँडमास्टर आणि माजी वर्ल्ड जुनिअर गर्ल्स चॅम्पियन सौम्या स्वामिनाथनने इराणमधील बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी न होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागच्या भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान हे बुद्धीबळ चषक इस्लामिक देश इराणच्या हमदान येथे पार पडणार आहे. त्यामध्ये हेडस्कार्फ बंधनकारक करण्यात आला आहे. हा नियम मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगत तिने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

"मला कुणीही हेडस्कार्फ किंवा बुरखा घालण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. इराणने महिला खेळाडूंना हेडस्कार्फ घालणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय मानवाधिकार, माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्य, धर्म आणि सद-सद विवेकबुद्धीवर गदा आणणारा आहे. सद्यस्थितीला माझ्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इराण दौरा नाही करणे हेच योग्य मला वाटते." 

पुण्याची 29 वर्षीय सौम्या स्वामिनाथन देशातील क्रमांक 5 ची आणि जगात क्रमांक 97 ची महिला चेसपटू आहे. तिने आपल्या भावना फेसबूकवर व्यक्त केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे, यापूर्वी 2016 मध्ये भारताची टॉप शूटर हीना सिद्धू हिने सुद्धा इराणच्या याच जाचक अटीमुळे आशियाई एअरगन संमेलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

सुरुवातीला तिला ही स्पर्धा बांग्लादेशात होणार असे समजले होते. त्यामुळेच तिने भारतीय टीममध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वेळ आणि स्थळ बदलल्यानंतर आलेले नियम पाहून आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे सौम्याने म्हटले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय बुद्धीबळ संघटनेची प्रतिक्रिया आली नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card