Tuesday, 22 January 2019

क्रेझी फॅनचे 'फिफा फिव्हर' .....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतात सर्वत्र फुटबाॅलचे क्रेझ वाढताना दिसत आहेत. असचं क्रेझ कोल्लम आणि कोलकता मधल्या फुटबाॅल क्रेझी फॅनने दाखवले आहे.

सुधीर हा ब्राझील फुटबॉल संघाचा मोठा फॅन आहे, हे कोल्लममध्ये सगळ्यांनाच परिचित आहे. त्याने आपलं घरं, कार आणि दुचाकीला आवडत्या ब्राझिल ध्वजाचा रंग चढवला आहे.

सुधीरने त्याच्या दोन मजलींचे घर पिवळ्या आणि निळ्या रंगात रंगवले आहे, ब्राझिल ध्वजाचा रंग हा फक्त त्याच्या घराला नाही, तर त्याच्या फोर्ड आयकॅान कार तसेच त्याच्या अॅक्टिवाला दिला आहे.

सुधीरने आपल्या मोटारीवर फेरबदल करण्यासाठी केवळ 56,000 रुपयांचा खर्च केला आणि त्याने मोटार वाहन खात्याकडून वाहनांची आणखी एक वर्षांसाठी देखभाल करण्यास परवानगी घेतली आहे.

"निश्चितपणे संघ यावेळी विजय करेल आणि मी कमीत कमी एक वर्षासाठी हा रंगांचा बदल ठेवणार आहे. माझे कुटुंब जे काही मी करत आहे त्याच्यावर ते खूप खूष आहेत, पण मग जर त्यांना माहिती असेल की मी यावर इतका पैसा खर्च केला आहे, मला खात्री आहे की ते हे ऐकूण नाखुश होतील. परंतु सर्वकाही टीमसाठी आहे, असे सुधीर सांगत आहे.

तर दुसरीकडे भारतातील एक अतिशय अर्जेंटिना क्रेझी फॅनने फुटबॉल विश्वकपच्या पूर्वी संघाच्या निळा आणि पांढर्या रंगात आपले घर रंगविले आहे.

'लिओनेल मेस्सीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाला सीमाच नाही' असं कोलकाताचे निवासी शिब शंकर पात्राने म्हटलं आहे.

पात्रा आपल्या इमारतीच्या तळमजल्यावरील एका दुकानातून चहा विकतो. त्याची आपल्या फुटबॉल हिरोला व्यक्तिशः पाहण्यासाठी रशियाला जायची इच्छा होती पण पैशाची कमतरता भासत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

आता फिव्हर 'फिफा विश्वचषक फुटबॉल'चा...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card