Tuesday, 22 January 2019

विराट कोहलीच्या दाढीचा विमा ? के.एल राहूलच्या व्हिडीओला विराटचं उत्तर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देत असतो. यासोबतच आपल्या लूकच्या बाबतीतही तो विशेष काळजी घेत असतो. विराटाची दाढी त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते, त्यामुळे तो आपला लूकही बदलताना दिसत नाही.

अनेक नवे क्रिकेटर्स विराटचा लूक कॉपी करताना दिसत असतात. विराटचं हे दाढीप्रेम एवढ्यावरच थांबलेलं नसून त्याने आता चक्क दाढीचा विमा काढला आहे.

के.एल. राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली सोफ्यावर बसलेला असताना दोन व्यक्ती त्याचे फोटो काढत आहेत. एका व्यक्तीने त्याच्या दाढीचा एक केस कापून एका प्लास्टिकमध्ये ठेवल्याचंही दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं दिसत आहे.

‘मला माहित होतं तुझं तुझ्या दाढीवर प्रचंड प्रेम आहे, पण आता तिचा विमा काढून तू माझी थिअरी खरी ठरवली आहेस’.असं के.एल. राहुलने ट्विट करताना लिहिलं आहे

व्हिडीओत पाहिलं तर सगळं झाल्यानंतर विराट कोहली एका कागदावर सही करतानाही दिसत आहे. ही के.एल.राहुलची थट्टा की खरोखर कोहलीने दाढीचा विमा काढला आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जोपर्यंत विराट कोहली स्वत: स्पष्ट करत नाही तोपर्यंत हे गूढच राहिल.

काहीजणांच्या मते दिल्लीनंतर लंडनमध्ये कोहलीचा मेणाचा पुतळा लावण्यात येणार असून त्यासाठीची ही तयारी असावी.

यावर विराटने दिलयं गंमतीदार उत्तर...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card