Saturday, 15 December 2018

#IPL2018 राजस्थानचा पंजाबवर 15 धावांनी विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर १५ धावांनी मात करत प्ले-ऑफमध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने ९५ धावांची नाबाद खेळी करून शेवटपर्यंत खेळी लढवली पण त्याचे प्रयत्न कमी पडले आणि राजस्थाने विजय पटकावला. राजस्थानसाठी 'करो या मरो' अशी ही मॅच होती. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, मात्र पंजाबने राजस्थानला १५८ धावांवर रोखले.

गेलसारखा तगडा फलंदाज असल्याने पंजाब हे आव्हान लिलया पार करेल असे वाटले होते मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. गेल आजच्या सामन्यातही चमक दाखवू शकला नाही. दुसऱ्याच षटकात अवघी एक धाव काढून तो माघारी परतला. गेल बाद झाल्यानंतर कर्णधार रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला.

मात्र भोपळाही न फोडता तो बाद झाला. त्याच्यानंतर करुण नायरही झटपट बाद झाला, त्यामुळे चौथ्या षटकात पंजाबची अवस्था ३ बाद १९ अशी झाली, त्यानंतर एका बाजूला भक्कमपणे उभे राहत लोकेश राहुलने लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कुणाचीही साथ लाभली नाही. त्यामुळे पंजाब २० षटकांत ७ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि राजस्थानच्या १५ धावांनी पंजाबचा पराभव झाला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card