Saturday, 15 December 2018

#IPL2018 बंगळुरुचा पराभव....हैदराबादचे गुणतालिकेत अव्वल स्थान भक्कम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

सनरायझर्स हैदराबाद संघाने पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. सोमवारी हैदराबादने बंगळुरुचा पराभव केला. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली. रॉयल चँलेंजर्स बँगलोर ६ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात पुन्हा एकदा हैदराबादने आपला हिसका दाखवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा डाव २० षटकात १४६ धावांवर संपुष्टात आणला. यावेळी रॉयल चँलेंजर्स बँगलोर सहज बाजी मारणार अशीच आशा होती. परंतु, हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरला २० षटकात ६ बाद १४१ धावांवर रोखताना सामन्याचे चित्रच पालटले.हैदराबादच्या या विजयात भुवनेश्वर कुमारने टाकलेले शेवटचे षटक महत्त्वाचे टाकले. 

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना सोमवारी पार पडला. बंगळुरु संघासमोर १४७ धावांचे लक्ष्य होते.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card