Tuesday, 22 January 2019

#IPL2018 लोकेश राहूलची जबरदस्त खेळी, पंजाबचा राजस्थानवर विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोकेश राहुलच्या तडाखेबंद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्ज 11 पंजाबने राजस्थान रॉयल्सवर ६ गडी राखून मात केली. या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्सला मागे टाकत पंजाबने गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे, तर दुसरीकडे गुणतक्त्यात तळाशी असलेल्या राजस्थानसाठी पुढची वाट अधिक खडतर बनली आहे. राजस्थानने २० षटकांत ९ बाद १५२ धावा करून पंजाबपुढे विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

हे लक्ष्य पंजाबने ४ गड्यांच्या मोबदल्यात ८ चेंडू शिल्लक असताना १९ व्या षटकातच पूर्ण केले. सलामीवीर लोकेश राहुलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला विजयपथावर नेले, त्याने ७ चौकार आणि ३ षटकार खेचून ५४ चेंडूत ८४ धावा केल्या. करुण नायर आणि मार्क्स स्टॉइनिसने त्याला चांगली साथ दिली. ख्रिस गेल या सामन्यात फेल ठरला.

गेल ८ धावांवर खेळत असताना जोफ्रा आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी, जोस बटलरने राजस्थान रॉयल्स संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने उपयुक्त साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानला निर्धारित २० षटकांत ९ बाद १५३ धावाच करता आल्या.

पंजाबचा फिरकी गोलंदाज मुजबीर उर रहमानने तीन विकेट घेऊन राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश राखला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आर. अश्विनने पहिल्याच षटकात शॉर्टला बाद केले. याचा परिणाम बटलरने आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही, त्याने पुढच्याच षटकात अंकित राजपूतला तीन चौकार लगावले. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याच्या साथीला आलेल्या अजिंक्य रहाणेला अधिक वेळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. रहाणे अवघ्या पाच धावांची भर घालून माघारी परतला.

loading...

राशी भविष्य