Tuesday, 22 January 2019

#IPL2018 चेन्नई सुपर किंग्ज - मुंबई इंडियन्स आज आमनेसामने

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला आपली पत राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघापुढे सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. 

चेन्नईसाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अजूनही विजयवीराची भूमिका अप्रतिमरीत्या बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे.  या मोसमात सातत्याने शैलीदार फलंदाजी करणारे शेन वॉटसन, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्यावरही चेन्नईची भिस्त आहे. मधल्या फळीत सुरेश रैना याच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

माञ, घरच्या मैदानावर हैदराबाद संघाविरुद्ध अवघे 119 धावांचे लक्ष्य गाठताना त्यांचा 87 धावांत खुर्दा उडाला होता. या धक्क्यातून मुंबईचा संघ अद्याप सावरलेला नाही. गोलंदाजीत मयांक मरकडे, जसप्रित बुमरा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अ‍ॅडम मिलने, मुस्ताफिझूर रेहमान यांच्यावर मुंबईची मोठी मदार आहे. मयांकने या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये 10 बळी घेत लक्षवेधक कामगिरी केली आहे.

हा सामना मुंबईसाठी आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

loading...

राशी भविष्य