Tuesday, 22 January 2019

#IPL2018 कोलकत्यापुढे 220 धावांचे आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

दिल्लीने कोलकत्यापुढे 220 धावांचे आव्हान ठेवले आहे.  कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने सामन्याला चांगली सुरुवात केली. कुलदीप यादवच्या दुसऱ्या षटकात कॉलिनने दमदार षटकार खेचला. संघाचा हा पहिलाच षटकार होता. पीयुष चावलाच्या तिसऱ्या षटकात पृथ्वी शॉ आणि कॉलिन मुर्नो यांनी चार चौकारांसह 18 धावा लूटल्या. दिल्लीचे पाचव्या षटकात अर्धशतक पूर्ण  कोलकाताचा अनुभवी गोलंदाज मिचेल जॉन्सनला पृथ्वीने दमदार षटकार लगावत चोख प्रत्यूत्तर दिले.  पृथ्वीने आपल्या दुसऱ्या सामन्यात सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर आयपीएलमधील पहिले शतक लगावले. 

कोलकाताच्या पीयुष चावलाने पृथ्वीला त्रिफळाचीत करत दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वीने 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. कोलकाताच्या आंद्रे रसेलने रीषभ पंतला पहिल्याच चेंडूवर बाद केले माञ रीषभला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कर्णधारपद स्वीकारल्यावर श्रेयसने आपल्या पहिल्याच समन्यात अर्धशतकी खेळी साकारली. सतराव्या षटकात षटकार लगावत श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरच्या षटकारासह दिल्लीच्या दोनशे धावा पूर्ण झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल बाद झाला आणि  दिल्लीला चौथा धक्का दिला.

loading...

राशी भविष्य