Tuesday, 22 January 2019

#IPL2018 हैदराबादची अडखळती सुरुवात, पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल2018 मधील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये आज सामना रंगला. हैदराबादने पंजाबला 133 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादच्या संघाने अडखळती सुरुवात केली. पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आतापर्यंत या दोन्ही संघांनी आतापर्यंत दमदार कामिगरी केली आहे. पंजाब सध्याच्या घडीला दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल. आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने ख्रिस गेलला संघात जागा दिली आहे.

पंजाबचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला चौथ्याच चेंडूवर बाद केले त्यामुळ् विल्यम्सनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. अंकित राजपूतने तिसऱ्या षटकात शिखर धवनला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. धवनने आठ चेंडूंत 2 चौकारांच्या जोरावर 11 धावा केल्या. तर अंकित राजपूतने पाचव्या षटकात वृद्धिमान साहाला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. शकिब मैदानावर आल्याबरोबरच पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, पण बरींदर सरणचा हा चेंडू पंचांनी नो बॉल ठरवला आणि शकिबला जीवदान मिळाले.

मनीष पांडे आणि शकिब अल हसन यांनी डाव सारवला आणि आठ षटकांत हैदराबादचे अर्धशतक पूर्ण झाले. शकिब आणि मनीष यांची अर्धशतकी भागीदारी केली. माञ मुजीब उर रेहमानने शकिबला बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला. शकिबने तीन चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. हैदराबादने सतराव्या षटकात शतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात अंकित राजपूतने मनीष पांडेला त्रिफळाचीत करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. मनीषने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 54 धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटका अंकित राजपूतने मनीष पांडेला त्रिफळाचीत करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. मनीषने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 54 धावांची खेळी साकारली.

 

loading...

राशी भविष्य