Sunday, 20 January 2019

गंभीरने सोडलं कर्णधारपद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल 2018 च्या चालू मोसमात सातत्याने अपयशी ठरणारा गौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद सोडलं. दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा आता श्रेयस अय्यर सांभाळणार आहे.

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने आतापर्यंतच्या 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावले आहेत. सततच्या पराभवामुळे गंभीरने कर्णधारपदावरुन पायउतार होणं पसंत केलं. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत होता. गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकाताने दोनवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र, गंभीरला तोच फॉर्म दिल्ली संघासोबत कायम राखता आला नाही.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card