Tuesday, 22 January 2019

#IPL2018 मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा, हैदराबाद 118 धावांवर आॅल आउट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल2018 मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची गाठ सनराईजर्स हैदराबादशी पडली.मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सनरायझर्स हैदराबादला 118 धावांवर आॅल आउट केले. मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली होती. खेळीच्या सुरुवातीला  केन विल्यम्सने सलग दोन चौकार मारले. मिचेन मॅक्लेघनने दुसऱ्या षटकात शिखर धवनला त्रिफळाचीत तर वृद्धिमान साहाला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. हैदराबादच्या 45 धावात हार्दिक पंड्याने पाचव्या षटकात मनीष पांडेला रोहित शर्माकरवी झेल बाद केले. अर्धशतकानंतर हार्दिक पंड्याने  कर्णधार केन विल्यम्सनला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले.

मुंबईचा युवा फिरकीपटू मयांक मार्कंडे याने नबीला त्रिफळाचीत करत आयपीएलमधला नववा बळी मिळवला आणि कोलकात्याच्या सुनील नरिनकडून पर्पल कॅप हिरावून घेतली.मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने रशिद खानला तर मयांक मार्कंडे याने बासिल थम्पीला बाद करत हैदराबादला धक्का दिला. पण हैदराबादच्या फलंदाजांना यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हैदराबादच्या युसूफ पठाणने अखेरपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला संघाला मोठी धावसंख्या उभारून देता आली नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card