Tuesday, 22 May 2018

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबचा 4 धावांनी निसटता विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने दिल्लीचा चार धावांनी पराभव केला. आयपीएल2018 मध्ये सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 143 धावांचे माफक लक्ष्य पार करताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची तारांबळ उडाली. श्रेयस अय्यरने अखेरच्या चेंडूपर्यंत खिंड लढवत दिल्लीच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या, परंतु दिल्लीला 139 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रेयसने 45 चेंडूंच पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 57 धावांची खेळी साकारली. 

पंजाबने दिल्लीचा चार धावांनी पराभव केला पण युवा फंलदाज पृथ्वीने पदार्पण करत विक्रम केला आहे. आयपीएलमधील सर्वात तरुण सलामीवीर होण्याचा विक्रम पृथ्वी शॉच्या नावावर झाला आहे.  याआधी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने छोटी पण आकर्षक खेळी केली. पृथ्वीने 10 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. 

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News