Tuesday, 22 January 2019

#IPL2018 आयपीएलमध्ये चेन्नईची दमदार खेळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. शेन वॉटसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जनं राजस्थान रॉयल्सचा 64 धावांनी मात करत विजय मिळवला. 106 धावा करुन वॉटसन सामनावीराचा मानकरी ठरला. या सामन्यामध्ये चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 5 विकेटच्या मोबदल्यात 204  धावांचं लक्ष्य राजस्थानसमोर ठेवलं. 

हे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली त्यांनी आपले महत्वाचे तीन फलंदाजी फक्त 32 धावांत गमावले आणि 140 धावांवर त्यांना समाधान मानावं लागलं. राजस्थानकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक 45 धावा केल्या, तर  चेन्नईकडून दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पण स्टोक्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card