Monday, 21 January 2019

#CWG2018 राष्ट्रकुल स्पर्धेत मधुरिकाची 'सुवर्ण' कामगिरी, मुंबईत जंगी स्वागत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत राज्यासह देशाची मान उंचवणारी मधुरिका पाटकर मुंबईत आपल्या सासरी दाखल झाल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आला. राष्ट्रकुलच्या टेबल टेनिस स्पर्धेत मधुरिकाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर सूनेचे सासरच्या मंडळींनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

आरती ओवळत आणि पुष्पवृष्टीचा वर्षाव मधुरिकावर करण्यात आले. यावेळी तिच्या स्वागतासाठी राजकीय मंडळी आणि मुंबईकरांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशे वाजवत मधुरिकाचं स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितींसोबत ढोल-ताशावर ताल धरण्याचा मोह मधुरिकालाही आवरता आला नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card