Saturday, 15 December 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवाल विजयी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सायना नेहवाल विजयी झालीय.पी. व्ही. सिंधूला 2-0 नं नमवून सायनाने सुवर्णपदक पटकावलंय. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलय. असे असले तरी देखील एकाच स्पर्धेत भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालय. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सायनाचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला एकेक गुण मिळवण्यासाठी झुंझावं लागलं. सायनानं संपूर्ण अनुभव पणाला लावत पहिला सेट 21-18 अशा गुणफरकानं जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूनं 'वापसी' केली. तिनं सायनालाही झुंजवलं. अखेर 23-21 अशा गुणफरकानं दुसरा सेट जिंकून सायनानं सुवर्णपदकाला गवसणी घातलीय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card