Thursday, 15 November 2018

दीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली 

एका ट्रॅव्हल वेबसाइटने विराट कोहलीला दीपिकासोबत जाहिरातीत काम करण्यासाठी विचारणा केली होती. मात्र अखेरीच्या क्षणी विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिलाय.

याचा मोठा फटका रॉयल चॅलेंजर बँगलोरच्या संघालाही बसला आहे. कारण ‘गो आयबीबो’ आणि ‘आरसीबी’ यांच्यात या जाहिरातीसाठी 11 कोटींचा करार झाला होता. विराटने सुरूवातीला तर या जाहिरातीत काम करण्यास रस दाखवला होता. परंतु आता त्याचं असं म्हणणंय की, ‘या जाहिरातीत ट्रॅव्हल वेबसाइटची ब्रॅंड अँबेसिडर येणार असल्याने ही जाहिरात आरसीबी संघाची राहणार नसून त्या कंपनीचीच होऊन जाईल’.

प्रसिद्ध चेहऱ्यांना जाहिरातीसाठी नेहमीच मागणी असते. कारण त्यांच्या प्रतिमेचा संबंधित ब्रँडला खूप फायदा होत असतो. हाच प्रयत्न या जाहिरातीतही करण्यात येत होता. विराटच्या नकारामुळे क्रिकेट आणि बॉलीवूडमधील या दोन ताऱ्यांना स्क्रीनवर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची संधी मात्र हुकलीय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card