Monday, 21 January 2019

ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील इतर सहा संघांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. 11 ते 21 मार्चदरम्यान हे सर्व सामने होणार आहेत. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, करणार आहेत. युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हा सुद्धा वेगवेगळ्या संघातून या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव सगळ्यात महागडे खेळाडू ठरले आहेत. रहाणे आणि सूर्यकुमार यांना अनुक्रमे मुंबई नॉर्थ आणि मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक म्हणजे सात लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. रोहित शर्माला सहा लाखांची बोली लावत मुंबई नॉर्थ वेस्ट संघाने विकत घेतलं. तर श्रेयस अय्यरवर मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाने पाच लाखांची बोली लावली.

अभिषेक नायर आणि सिद्धेश लाडचा त्यांच्या मूळ किंमतीत म्हणजेच चार लाखात मुंबई साऊथ आणि मुंबई साऊथ वेस्ट संघाचे आयकॉन खेळाडू या नात्याने समावेश करण्यात आला. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या टी ट्वेन्टी मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँबेसेडर आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card