Sunday, 18 March 2018

पत्नीच्या गंभीर आरोपानंतर शमीला फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा थेट आरोप तिने केला.

शमीवर झालेल्या या आरोपांमुळे मोठा फटका त्याला बसलाय. कारण, बीसीसीआयने आजचा कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळलंय. शमीला नेमकं का वगळलं याचं कारण स्पष्ट नसलं तरी एकूणच त्याला या प्रकाराचा फटका बसलाय.

बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 27 खेळाडूंचा समावेश असून त्यांची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर खेळाडूंच्या मानधनात बीसीसीआयने तब्बल 200 टक्क्यांनी वाढ केलीय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News