Monday, 21 January 2019

अंडर-19 विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं.

मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतनं 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या.

भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

मात्र, पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद पण मनजोत कालराने संयमी खेळी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. उपांत्य सामन्यात शतक झळकावणारा शुबमन गिलने देखील मनजोतला चांगली साथ दिली. पण तो 31 धावांवर परम उपलचा बळी ठरला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card