Wednesday, 16 January 2019

भारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

अंडर-19 वर्ल्डकप सामन्याच्या सेमिफायनलमध्ये मंगळवारी भारताने पाकिस्तानला 203 धावांनी पराभूत केले आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुभम गिलने शतकी खेळी करत भारताला 272 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 29.3 ओव्हरमध्ये फक्त 69 धावांत संपुष्टात आला.

भारताकडून ईशान पोरेलने 4 विकेट घेतल्या. पाकिस्तानचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा वातावरण फलंदाजीसाठी पोषक होते. तरीही त्यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.  पाकिस्तानचा स्टार बॅट्समन अली जफरयाब 1 रन काढून बाद झाला. पाकिस्तानच्या डावात पहिल्या 12 पैकी 6 ओव्हर मेडन राहिल्या.

2014 नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाक यांच्यात अंडर-19 टूर्नामेंटमधील प्रथम सामना होता. या स्पर्धेत 20 वेळा दोन्ही संघ आमने-सामने आले त्यापैकी 12 वेळा भारताचा विजय झाला. शनिवारी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card