Friday, 18 January 2019

आयपीएलच्या अकराव्या सीझनसाठी खेळाडूंचा बंगळुरुत लिलाव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आयपीएलच्या अकराव्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव बंगळुरुत पार पडणार आहे. आज आणि उद्या होणाऱ्या या लिलावात गौतम गंभीर, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, बेन स्टोक्स यांसह दिग्गजांवर बोली लागणार आहे.

यंदाच्या आयपीएल मोसमात खेळाडूंना 8 स्लॅबमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या स्लॅबमधील खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये असेल. दुसरा स्लॅब 1.5 कोटी, तिसरा स्लॅब 1 कोटी, चौथा स्लॅब 75 लाख आणि पाचव्या स्लॅबची किंमत 50 लाख रुपये असेल.

याशिवाय इतर तीन स्लॅबमध्ये अनकॅप्ड खेळाडू असतील, ज्यांची बेस प्राईस 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये असेल. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश असेल.

या लिलावात एकूण 578 खेळाडूंचा लिलाव होईल. ज्यामध्ये 361 भारतीय आहेत, कॅप्ड प्लेयरची संख्या 244 आहे, ज्यामध्ये भारताच्या 62 खेळाडूंचा समावेश आहे. तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 332 आहे, ज्यामध्ये 34 परदेशी खेळाडू आहेत. आयसीसीच्या सहयोगी देशांच्याही दोन खेळाडूंचा समावेश आहे.


loading...

राशी भविष्य

Cricket Score Card