Thursday, 22 February 2018

कबड्डीसाठी काय पण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

महाराष्ट्राच्या मातीचा खेळ म्हणजे कबड्डी. देशभरात आणि नंतर सातासुमद्रापार कबड्डीला पोहचवण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आणि संबंधित संघटनांचा फार मोठा वाटा आहे.

गेली काही वर्षांत आपल्या मातीतल्या या खेळाला पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या अतिसवेदनशील नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातही अशीच एक आगळीवेगळी कबड्डी स्पर्धा रंगली होती.

या तीन दिवसीय आंतरराज्यीय स्पर्धा लक्षणीय ठरली ती आदिवासी वयोवृद्ध महिलांच्या सहभागामुळं.

सालकेसा तालुक्यातल्या भजेपार गावात सूर्योदय क्रीडा मंडळातर्फे मागील 9 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येतेय. महिलांनी पातळ तर वृद्धमंडळींनी धोतर नेसून कबड्डी खेळली.

अंतिम सामन्याला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला. हरियाणा स्टिलर्सचे प्रो-कबड्डी प्लेयर प्रमोद नरवाल आणि बंगळुरू बुल्सचे प्रो कबड्डी प्लेयर प्रीतम छिलर यांनी विशेष हजेरी लावली.

या तीनदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांतल्या 60हून अधिक चमूनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागात अशा प्रकारे भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केल्यामुळं खेळाडूंनी देखील आनंद व्यक्त केला.

हॉकीप्रमाणं कबड्डी खेळाला देखील राष्ट्रीय दर्जा मिळायला हवा, अशी अपेक्षा या कबड्डीपटूंनी केली.

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News