Thursday, 22 February 2018

ब्रँड विराट कोहली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी तो आज  कोटी रुपये मानधन घेतो आणि तरीही जाहिरातदार ब्रँड विराटचे चाहते आहेत. सिनेअभिनेत्री अऩुष्का शर्मा हिच्याबरोबरच्या अफेअरमुळंही तो कायम चर्चेत राहिला आणि गेल्या वर्षी डिसेंबर अखेर दोघे विवाहबंधनात अडकल्यानंतर या दोघांचे फोटो आणि व्हिडियो देखील खूप व्हायरल झाले. तडाखेबंद फलंदाज ते कर्णधार अन् प्रियकर ते जीवनसाथी असा प्रवास करणारा विराटचा आणखी एक समांतर प्रवास सुरू आहे.

विविध उत्पादनांचा ब्रॅण्ड बनलेला विराटनं वन-एट या नावानं स्वत:चा ब्रॅण्ड बाजारात आणला. मुलांना मैदानात खेळायला प्रवृत्त करण्यासाठी त्यानं हा लाइफस्टाइल ब्रॅण्ड बाजारात आणलाय. या ब्रॅण्डखाली त्यानं जवळपास 15 ब्रॅण्ड बाजारात आणलेयत. 

गेल्या वर्षीच्या एका आकडेवारीनुसार जाहिरात विश्वातला सर्वाधिक मागणी असलेला महागडा ब्रँड म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर होता. विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यू 9.16 अब्ज इतकी होती. या शर्यतीत त्यानं बॉलिवूडचा किंग खान शाहरूखलाही मागे टाकलं होतं. ब्रँडच्या यादीत गेल्या वर्षी शाहरुख खान सर्वात वरच्या स्थानावर होता. परंतु, शाहरूखला मागे टाकत आता ती जागा विराटने पटकावली. शाहरूखची ब्रँड व्हॅल्यू ६.७९ अब्ज होती. मैदानावरील दमदार कामगिरीमुळे विराट आजच्या घडीला देशातील लोकप्रिय सेलिब्रिटी असून, बहुतांश ब्रॅण्डसची पहिली पसंती तोच आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News