Tuesday, 22 January 2019

शिखर धवनच्या कुटुंबीयांचा दुबई विमानतळावर अटकाव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया केप टाऊनला रवाना झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवनही त्याच्या पत्नी आणि मुलांसह दक्षिण आफ्रिकेला निघाला. मात्र आवश्यक कागदपत्रं नसल्यामुळे एमिरेट्सने धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखून धरलं. एमिरेट्स एअरलाईन्सच्या या वर्तणूकीमुळे संतापलेल्या शिखर धवनने शुक्रवारी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला.

5 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडीयाचा पहिला कसोटी सामना केप टाऊनमध्ये खेळणार आहे. त्यासाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट संघ मुंबईहून रवाना झाला. केप टाऊनसाठी दुबईवरुन कनेक्टिंग फ्लाईट पकडायची होती. मात्र पत्नी आणि मुलांना एमिरेट्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुबई विमानतळावरच थांबवलं. त्यामुळे त्यांना पुढचा प्रवास करता आला नाही.ओळखीचा पुरावा म्हणून जन्माच्या दाखल्यासह इतर काही कागदपत्रं सादर करण्यास पत्नी-मुलांना सांगितल्याचं शिखरने ट्विटरवर म्हटलं आहे.

'अत्यंत अनप्रोफेशनल वर्तन. मी माझ्या कुटुंबासोबत दक्षिण आफ्रिकेला चाललो होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं की दुबईवरुन माझी पत्नी आणि मुलं फ्लाईटमध्ये बोर्डिंग करु शकत नाहीत. मुलांच्या जन्माचा दाखला आणि इतर काही कागदपत्रं सादर करण्यास आम्हाला सांगितलं, जी अर्थातच त्यावेळी आमच्याकडे नव्हती.'

shikhardhavn2.png

'आवश्यक त्या कागदपत्रांची वाट पाहत माझं कुटुंब दुबई विमानतळावर थांबलं आहे. आम्ही मुंबईला विमानात चढतानाच एमिरेट्स कंपनीने या प्रकाराची कल्पना का नाही दिली? एमिरेट्सचा एक कर्मचारी तर कुठलंही कारण नसताना उद्धटपणे वागत होता.' असं शिखरने ट्वीटमध्ये लिहिलं आहे

shikhardhavn1.png

एमिरेट्स ने त्याबाबत प्रतिउत्तर करत सांगितल की, 18 वर्षांखालील (अल्पवयीन) व्यक्तीसोबत दक्षिण आफ्रिकेला प्रवास करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने  पालकत्व सिद्ध करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जी व्यक्ती स्वतःच्या अल्पवयीन अपत्यासोबत प्रवास करत आहे, तिनेही या प्रवासासाठी आपल्या जोडीदाराची परवानगी असल्याचं पत्र सादर करणं गरजेचं आहे, असं एमिरेट्सने स्पष्ट केलं.

loading...

राशी भविष्य