Monday, 19 February 2018

मास्टर-ब्लास्टर सचिनने सेहवागला दिले 1 कोटी 14 लाखांचं स्पेशल सरप्राईज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

क्रिकेट जगतात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीची धमाल प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आठवणीत आहे. दोघंही फलंदाजीसाठी उतरले की गोलंदाजाला घाम फुटायचा आणि मैदानावर धावांचा पाऊस पडायचा.

 

सेहवाग आणि सचिन पार्टनरच नाहीत तर खूप चांगले मित्र देखील आहेत. म्हणूनच की काय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही दोघांची मैत्री तितकीच घट्ट आहे.

 

वीरेंद्र सेहवागने नुकताच एका बीएमडब्लू कारसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना त्यानं बीएमडब्लू कार आणि सचिन तेंडुलकरला मेंशन करुन आभार मानलेत.

 

या पोस्ट वरूनच समजतंय की सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटिंग पार्टनरला बीएमडब्ल्यू 7 सिरीजची एक कार गिफ्ट केली. दसऱ्याला महागडी कार गिफ्ट म्हणून मिळाल्यानं सेहवाग भलताच खुश झाला आहे. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News