Wednesday, 21 February 2018

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कोलकता


कोलकाता येथील ईडन गार्डनवर भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे क्रिकेट मालिकांच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी मात करत दमदार बाजी मारली आहे. भारताने दिलेल्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची तगडी फंलदाजी भारताच्या गोलंदाजीपुढे ढासळली. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

 

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वन-डे मध्ये तीन चेडूंमध्ये तीन फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रीक केली. 32 व्या षटकांतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांचा धुव्वा उडवला.

 

गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, चहल आणि कुलदिप यादव यांनी दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही.

 

भुवनेश्वर, चहल आणि पंड्याने ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले असताना त्यात भर म्हणून कुलदिपने सलग तीन फलंदाजांना बाद करत त्यांच कंबरडचं मोडले.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News