Wednesday, 23 January 2019

उद्या रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उद्या रविवार असल्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

तसेच रविवारी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 31 मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकावरून अप धिम्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबविण्यात येणार असून माटुंगावरून अप धिम्या मार्गावर धावतील.

सकाळी 11 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 6 मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकावरून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल संबंधित स्थानक थांब्यासह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तर सकाळी 10 वाजून 16 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 54 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. त्यामुळे रविवारी मेगाब्लॉक असल्यामुळे उद्या सर्व लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य