Friday, 14 December 2018

बीग बींची डॉक्युमेंट्री पाहून 'त्याने' चिमुरडीला वाचवले बलात्कारापासून

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सिनेमा, त्यातले कलाकार, त्यांचे डायलाॅग प्रक्षेकांवर त्याचा मोठा प्रभाव होतो.  काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या  व्हिडिओमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईकरांना जागरुक  करण्यासाठी एका पोलिसाची भूमिका केली होती.

या अमिताभच्या डॉक्युमेंट्रीमुळे 4 वर्षाच्या मुलीला बलात्कारापासून वाचवल्याची मुंबईतील एक घटना आता समोर आली आहे.

मुंबईतील मुलुंडमध्ये राहणारा व्यक्ती सरवीन सिंग आपल्या मित्रासोबत घरी जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडूपातून त्याला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला.

सरवीनने आवाजाचा दिशेने धाव घेतली तेव्हा त्याच्या दिसलं की एक लहान मुलगी रडत आहे. त्या मुलीच्या अंगावर कपडेही नव्हते. ती मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत तिथं पडली होती आणि तिच्या शेजारी एक तरुण उभा होता.

सरवीन सिंगने मुलीशेजारी उभ्या असणाऱ्या त्या तरुणाला याबाबत विचारलं. तेव्हा त्या तरुणाने ही माझी मुलगी असल्याचे सांगितले. मी तिला बाथरूमला घेऊन आलोय. पण आरोपीची ही चलाखी सरवीनच्या लक्षात आली. कारण त्या 4 वर्षांच्या मुलीच्या नाकातून रक्त येत होतं. तसंच तिच्या अंगावर कपडेही नव्हते.

सरवीन सिंगच्या लक्षात आलं की, हा जर मुलीचा बाप असता तर त्याने लहान मुलीला झुडपामध्ये बाथरूमसाठी कसं काय घेऊन आला? तिच्या नाकातून रक्त येत असल्याने तो आधी तिला रुग्णालयात का घेऊन गेला नाही. अत्याचार करण्यासाठीच  या तरुणाने लहानगीला झुडुपात आणले असावे, याची खात्री झाल्यानंतर सरवीनने मोठ्याने आरडा-ओरडा केला. सरवीनचा आवाज ऐकताच रस्त्यावरून येणारे-जाणारे लोकही तिकडे जमा झाले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीसांनी सरवीन सिंगला याबाबत विचारपूस केल्यानंतर त्याने सर्व माहीती देत अमिताभ बच्चनचाही उल्लेख केला आहे. 'मी अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता आहे आणि त्यांनी नुकताच केलेल्या व्हिडिओने मी प्रभावित झालो होतो,' असं या 4 वर्षांच्या लहानगीला बलात्कारापासून वाचवणाऱ्या सरवीन सिंगने म्हटलं आहे.


 

loading...

Top 10 News

राशी भविष्य