Friday, 14 December 2018

लग्नसराईच्या काळात सोन्याची स्वस्ताई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सोन्याचे दर हे नेमके दिवाळीच्या दिवसातच वाढले होते. जवळपास 32 हजारांच्या आसपास गेलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण झाली आहे. दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात सोन्याचा दर जास्त असतो. या वर्षीदेखील नेमका असाच ट्रेंड पाहायला मिळाला.

मात्र, दिवाळी संपल्यानंतर आणि डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. लग्नाच्या मुहूर्तावर सोन्याचा दर आता जवळपास 1100 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे अनेक सराफा दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात इतके होते सोन्याचे दर -

  • नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक तोळे सोन्याचा दर 31 हजार 900 रुपये इतका होता.
  • 5 ते 8 नोव्हेंबर या दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचा दर 31 हजार 695 रुपये ते 31 हजार 465 या दरम्यान होता.

आज सोन्याचा दर 1100 रुपयांनी कमी होऊन 30 हजार 827 रुपयांवर आला आहे. गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात प्रति तोळा 1 हजार रुपयांची घट झाली आहे. दोन महिन्यात सोन्याचा दर 31 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर 5 एप्रिल 2019 पर्यंत हा दर 31 हजार 208 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

सोन्याच्या दरात घसरण होण्याचे कारण -

  • गेल्या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारलं आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.
  • 4 नोव्हेंबरला डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 72.90 रुपये होतं.
  • मात्र आता रुपयाची स्थिती सुधारली आहे. आज 70.47 रुपये इतकं आहे.
  • रुपयाचं मूल्य वधारल्यानं सोन्याच्या दरात घट झाली आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य