Monday, 17 December 2018

पनवेल, भिवंडी, मालेगावचा निकालाचे अपडेट्स

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

 

LIVE UPDATES:

 

#भिवंडी काँग्रेस 42 जागांवर विजयी

#पनवेल शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपची हाफ सेंच्युरी, भाजपचा 51 जागांवर विजयी

#पनवेल शेकापच्या गडात भाजपचा धोबीपछाड, भाजचा 46 जागांवर विजय

#भिवंडी काँग्रेस 25 जागांवर विजयी

#पनवेल भाजपचा शेकापला धोबीपछाड, भाजपचा 45 जागांवर विजय

#पनवेल भाजप 44 जागांवर विजयी

#शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे 11 उमेदवार विजयी

#भिवंडी - काँग्रेस 1 वाजेपर्यंत 25 जागांवर आघाडीवर

#भिवंडी काँग्रेसची आगेकूच

#पनवेलमध्ये भाजपच बाहुबली, भाजपला 42 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत

#मालेगाव विद्यमान महापौरांना पराभवाचा धक्का, प्रभाग क्रमांक 13 मधून काँग्रेस उमेदवाराने केला पराभव

#पनवेल भाजप 40 जागा आघाडीवर

#मालेगाव एमआयएम 10 जागांवर विजयी

#भिवंडी प्रभाग क्रमांक 2,4,9 मध्ये काँग्रेसची आगेकूच

#मालेगाव एमआयएम पक्षाची घोडदौड सुरूच, 10 जागांवर विजयी

#पनवेल भाजपची 34 जागांवर आघाडी, शेकापला 15 आणि शिवसेना अवघ्या 1 जागेवर

#मालेगाव भाजपची पिछेहाट, राष्ट्रवादीची मुसंडी, राष्ट्रवादी 24 जागांवर

#पनवेल भाजप 30 जागांवर विजयी, मॅजिक फिगरसाठी भाजपला 10 जागा आवश्यक

#मालेगाव काँग्रेस 10 जागा, शिवसेना 7, भाजप 1, एमआयएम 7 आघाडीवर

#भिवंडी काँग्रेस 12 जागांवर विजयी

#पनवेल शेकापला भाजपचा धक्का, भाजपाकडून जल्लोष सुरू, भाजप 19 जागांवर विजयी

#मालेगाव भुजबळांचे निकटवर्तीय नरेंद्र सोनावणे यांचा दारूण पराभव

#पनवेल भाजपचे भूमेश कल्याडप्पू वॉर्ड क्रमांक 16 मधून विजयी

#पनवेल भाजप 19 जागांवर विजयी

#भिवंडी काँग्रेसने खातं उघडलं, प्रभाग 2 अ मधून नमरा औरंगजेब अन्सारी विजयी

#मालेगाव शिवसेना महानगरप्रमुखाच्या पत्नीला पराभवाचा धक्का

#पनवेल प्रभाग क्रमांक 17 चा गड भाजप ने राखला

#पनवेलमध्ये भाजप 15 जागांवर विजयी

#भिवंडी - भाजप 10, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5, शिवसेना 5, कोणार्क 4, ऱिपाई 1, अपक्ष 1 आघाडीवर

#भिवंडी पहिल्या फेरीत भाजप 5, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 3 सेना 1 आघाडीवर

#पनवेल भाजप 13, शेकाप 9, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर

#पनवेल भाजप 13, शेकाप 9, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर

#पनवेलमध्ये शेकाप- आघाडीने उघडलं खातं

#मालेगाव राष्ट्रवादीनेही उघडलं खातं, तर काँग्रेसची 3 जागांवर आघाडी

#मालेगाव शिवसेना एका जागेवर आघाडी

#पनवेलमध्ये भाजपनं खातं उघडलं

#मालेगावमध्ये #MIM ने खातं उघडलं

#मालेगावमध्ये काँग्रेस 18 अ प्रभागातून आघाडीवर

थोड्याच वेळात येणार पहिलाच कल हाती, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोण जिंकणार महापालिकांचा महासंग्राम. कोणाला मिळणार खुर्ची तर कोणाला झोंबणार मिर्ची याचं उत्तर आज मिळणार आहे. कारण भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकांचा निकाल आज लागणार आहे.

तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भिवंडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, शिवसेना, भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

तर मालेगावमध्ये काँग्रेस भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे. पनवेलमध्ये महाआघाडी आणि भाजपमध्ये मुख्यत्वे ही लढत होती. तेव्हा आता कोणता पक्ष यात बाजी मारतो याचा निकाल काही तासांमध्येच लागणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य