Friday, 18 January 2019

वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 10 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत

सुदैवाने या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

नर्गिस दत्तनगरमध्ये झोपडपट्टीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

सकाळी 11.30 च्या दरम्यान ही आग लागली होती. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जवळपास 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे

loading...

Top 10 News

राशी भविष्य