Friday, 18 January 2019

‘हिटमॅन’ रोहीतचं दीडशतक तर रायडूची शतकी खेळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईच्या ब्रेबोरने स्टेडियमवर सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर रोहीत शर्माने शानदार दीडशतक ठोकले. त्याचबरोबर अंबती रायडूने शतक ठोकले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या खेळीमुळे भारतीय संघाला साडेतीनशेचा आकडा पार करण्यात यश आलं आहे.

विंडीडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक ठोकले होते. या सामन्यात मात्र त्याला जास्त काळ मैदानात टिकता आलं नाही. पण त्याच्या जागी भारताचा सलामीवीर रोहीत शर्माने दिडशतक ठोकून ती कस भरुन काढली. रोहीतने 137 चेंडूत 162 धावा करुन तो बाद झाला. यामध्ये त्याने 20 चौकार आणि चार षटकार ठोकले आहेत. हे त्याचं 21 वे एकदिवसीय शतक आहे. 

रोहीतला साथ मिळाली ती अंबती रायडूची. रोहीत पाठोपाठ रायडूने देखील आपलं शतक पुर्ण केलं. रायडूने 81 चेंडूत 100 धावा केल्या आणि तो धावबाद झाला. या धावांमध्ये त्याने 8 चौकार आणि चार षटकार ठोकल्या आहेत. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने 377 धावा केल्या असून चौथा सामना जिंकण्यासाठी विंडीज समोर 378 धावांचे आव्हान ठेवलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य