Friday, 18 January 2019

खड्डा चुकवण्याच्या नादात कुटुंब उद्धवस्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईतील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. आज देखील अशीच एक घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडलीय. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एका खड्डयात अडकून दुचाकीवरील आईसह 11 महिन्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला आहे.

मुंबईतील रस्त्यावरच्या ट्रॅफीकमुळे बरेचजण लोकलचा आधार घेतात. पण रस्त्यावर गाडी चालवणाऱ्यांनी मात्र आपला जीव मुठीत ठेऊनच गाडी चालवावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार, प्रमोद घडशी हे पत्नी पूजा आणि समर्थ या बाळासह आपल्या दुचाकीवर  घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर  जात होते.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या कचरा वाहून नेणाऱ्या डपंर चालकाने जोरात  हॉर्न  वाजवला त्यामुळे ते दचकले. त्याचवेळी समोर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरली. प्रमोद, पत्नी आणि चिमुकल्याबरोबर दुचाकीसह खाली पडले आणि   डम्परच्या चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर  उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर उरलेल्या रस्त्यामध्य़े अनेक खड्डे आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी आंदोलनंही केली पण हे खड्डे काही बुजवले गेले नाही. अपघात घडलेल्या स्थळी झालेला खड्डा अखेर स्थानिकांनी बुजवला. पण वेळीच हा खड्डा बुजवला असता तर आज दोन जणांचा जीव वाचला असता. या प्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालक शम्मी उल्ला रहमत अली शहाला अटक केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य