Friday, 18 January 2019

‘या’ गाडीमुळे मुंबईतील समुद्रकिनारे होतील स्वच्छ!

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

मुंबईला भलामोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. नैसर्गिक सोंदर्याने नटलेल्या या समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे.

समुद्रकिनारा स्वच्छ रहावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू असतात. पण त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपूरे पडत आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकही निराश झालेत. यासाठी अनेक सामाजिक संस्थापुढे येऊन स्वच्छतेसंदर्भात जागरूकता निर्माण करत आहेत. आता सेवाभावी संस्थेकडून वर्सोवा बीच स्वच्छ करण्यात येत आहे.

मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ राहावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अफरोझ शाह या तरुणाने एक पाऊल उचललं. तीन वर्षांपूर्वी एकट्याने सुरू केलेल्या या स्वच्छते मोहीमेमध्ये आज स्व-इच्छेने हजारो लोक जोडले गेलेत. यामध्ये खासकरुन तरूण वर्गाला या कामाचे महत्त्व जास्त कळत असल्याने त्यांची जास्त मदत होतं आहे. मात्र, फक्त मानवी मदतीने होणारे हे काम नसून त्याला टेक्नॉलॉगीची साथही हवी यासाठी रिलायंस कंपनीकडून बॉंबकॅट नावाची अद्यावत गाडी दिली आहे.

Versova-Beach2.jpg

या गाडीमुळे जमिनीच्या एक फूट आतील कचरा काढता येतो. तसंच एका तासांत 500 जण मिळून जेवढी सफाई करू शकतात तेवढी सफाई ही मशीन एका तासात करते. त्यामुळे मुंबईतील 19 समुद्र किनाऱ्यावर प्रत्येकी दोन अशा गाड्या असल्या तर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ होतील असे अफरोझ यांना वाटतं. म्हणून ही गाडी जरी आता एका खासगी कंपनीने दिली असली तरी महानगरपालिकेकडून अशा गाड्यांची व्यवस्था झाली तर मुंबईचे सर्व समुद्रकिनारे स्वच्छ पाहायला मिळतील अशी आशा पर्यावरणप्रेमी ठेवत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य