Friday, 18 January 2019

अजित पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि उद्धव ठाकरेंमधला संघर्ष आता तीव्र होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधता आलं नाही ते आता राम मंदिर बांधायला निघालेत, या शब्दात अजित पवारांनी टीका केली होती.

शिवसेनेवर केलेल्या टीकेला सामानमधून अत्यंत तिखट शब्दात उत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने आणि कृपेनेच ते तरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही, या शब्दात अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य