Friday, 18 January 2019

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘त्या’ दोघांची हाणामारी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका दिवसेंदिवस रोमांचक वळणावर जात आहे, यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेची लोकप्रियता वाढतच चालली आहे.

मात्र या प्रसिद्ध मालिकेमुळे अंबरनाथमध्ये चक्क अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली असून यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान प्रकाश कराड हे बुधवारी सायंकाळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पाहत होते.

यावेळी त्यांचा सहकारी किशोर भोर याला भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट सामना पाहायचा होता. त्यामुळे किशोरने टीव्हीचे चॅनल बदलून तो क्रिकेट सामना पाहत बसला. यातून किशोर आणि प्रकाश यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाले आणि या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

दरम्यान किशोरने रागाच्या भरात लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे प्रकाश जखमी झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात किशोरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य