Friday, 18 January 2019

सीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेसचं देशभर आंदोलन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेस निदर्शने करत आहे. दिल्लीच्या सीबीआय मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबईतही या मुद्यावर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.

राफेल घोटाळा दडपण्यासाठी मोदी सरकारने मध्यरात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मुंबईच्या बीकेसीमधील सीबीआयच्या कार्यालयावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम आणि सचिन सावंत चरणसिंग सपरा या काँग्रेस कार्यकर्यांना ताब्यात घेण्यात आले. 

सीबीआयच्या मुंबई, लखनऊमधील कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.

  • सीबीआयमधील वादावरुन काँग्रेस आक्रमक
  • राहुल गांधी दिल्लीत उतरले रस्त्यावर
  • काँग्रेसची देशभरात आंदोलनं

सीबीआयचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दारी, सुनावणीला सुरुवात

loading...

Top 10 News

राशी भविष्य