Tuesday, 18 December 2018

विलेपार्लेतील विहिरीत 3 जणांचा बुडून मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

विलेपार्लेतील विहिरीत 3 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विजय पांडे, दिव्या आणि रेणू यादव या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

दीक्षित रोडवरील विहिरीचा कठडा तुटल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे.

रुईया बंगला अशा खाजगी ठिकाणी ही विहिर आहे, धार्मिक विधीसाठी या विहिरीवर या महिला जमल्या होत्या.

विहिर जुनी असल्यामुळे स्लॅब तुटून या महिला विहिरीत पडल्या, या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आतापर्यंत 7 ते 8 महिलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

कशी घडली घटना

  • हिंदी भाषिक महिला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पूजा करतात.
  • या पूजेत महिला दोन दिवसाचा उपवास ठेवतात.
  • हा उपहास सोडण्यासाठी त्या विहिरीवर पूजा करतात.
  • आज संध्याकाळी या विहिरीवर पूजा सुरू होती, पूजेदरम्यान 35 महिला या विहिरीवर उपस्थित असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
  • स्लॅब कोसळल्यानंतर इतर महिलांनी पळ काढला. मात्र काही महिला विहिरीत पडल्या. या घटनेनंतर मदतकार्य सुरु करण्यात आलं.
loading...

Top 10 News

राशी भविष्य